ग्रामपंचायत कार्यालय बदद्ल माहिती
ग्रामपंचायत माहिती
ग्रुप ग्रामपंचायत धामणगाव ही ग्रामपंचायत ता. इगतपुरी, जि. नाशिक येथे स्थित आहे. या ग्रामपंचायतीची स्थापना १ जून १९५६ रोजी झाली आहे. या ग्रामपंचायतीत धामणगाव व गंभीरवाडी ही दोन महसूल गावे समाविष्ट आहेत. ग्रामपंचायतीचे एकूण भौगोलिक क्षेत्र १११९ हेक्टर असून त्यापैकी ९१७.३० हे.आर क्षेत्र बागायती असून २०१.७० हे.आर क्षेत्र कोरडवाहू जमिनीचे आहे. गावाची एकूण लोकसंख्या (जनगणना २०११ नुसार) ४६२० इतकी आहे, त्यामध्ये अनुसूचित जाती – २६१, अनुसूचित जमाती – २२८७, आणि इतर घटकांची लोकसंख्या २०७२ आहे. गावातील एकूण कुटुंब संख्या ७९२ असून त्यात धामणगाव – ५७९ आणि गंभीरवाडी – २१३ कुटुंबांचा समावेश आहे.
धामणगाव २०११ च्या जनगणनेचा तपशील
जनगणना मापदंड | जनगणना माहिती
| माहितीचा प्रकार | तपशील |
|---|---|
| ग्रामपंचायत नाव | धामणगाव |
| तालुका / जिल्हा | ता. इगतपुरी, जि. नाशिक |
| स्थापना दिनांक | ०१/०६/१९५६ |
| समाविष्ट गावे | धामणगाव, गंभीरवाडी |
| एकूण भौगोलिक क्षेत्र | १११९ हेक्टर |
| बागायती जमीन | ९१७.३० हे.आर |
| कोरडवाहू जमीन | २०१.७० हे.आर |
| एकूण लोकसंख्या | ४६२० (अनु.जाती – २६१, अनु.जमाती – २२८७, इतर – २०७२) |
| एकूण कुटुंब संख्या | ७९२ (धामणगाव – ५७९, गंभीरवाडी – २१३) |
| ग्रामपंचायत कार्यालय | असून कार्यरत |
| तलाठी कार्यालय | असून कार्यरत |
| प्राथमिक आरोग्य केंद्र | असून कार्यरत |
| बँका | बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया (शाखा – धामणगाव) |
| पोस्ट ऑफिस | धामणगाव |
| शाळा | जि.प. शाळा (२), माध्यमिक विद्यालय, आश्रमशाळा (२) |
| अंगणवाडी केंद्रे | धामणगाव – ६, गंभीरवाडी – ३ |
“स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीत ध्वजवंदन सोहळा”
गावातील ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजवंदनाचा भव्य सोहळा पार पडला. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, महिला बचतगट, शाळकरी मुले, नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले. राष्ट्रध्वजाला सलामी देत देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण, ग्रामविकासाची शपथ आणि समाजातील ऐक्य-सौहार्द वाढवण्याचा संकल्प या सोहळ्यात करण्यात आला
राष्ट्रध्वजास वंदन, देशभक्तीची शपथ; ग्रामविकासासाठी आपलीच कटीबद्धता!
लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
(2011 जनगणना)
1000
पुरुष
500
महिला
100
गृहसंख्या (घरांची संख्या):
0
प्रशासकीय संरचना
ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील
| अ.क्र. | लोकसेवेचे नाव | कामकाजाचे दि. | प्र. फी | पदनिर्देशित अधिकारी |
|---|---|---|---|---|
| १. | जन्म नोंद दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| २. | मृत्यू नोंद दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ३. | विवाह नोंद दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ४. | दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला | ७ दिवस | निशुल्क | सा.ग.ट.बि.अ |
| ५. | ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ६. | नमुना ‘८’ चा उतारा | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ७. | निराधार असल्याचा दाखला | ७ दिवस | निशुल्क | ग्रामपंचायत अधिकारी |